New Business Ideas in Marathi : कमी खर्चात एखादा नवीन बिझनेस सुरु करण्यासाठी काही आयडिया Laghu Udyog Small Business Ideas in 2022 with low investment in marathi कमी गुंतवणुकीत सुरु होणार बिझनेस | Katarnak Marathi Song Alight Motion Editing

New Business Ideas

 New Business Ideas in Marathi: कमी खर्चात एखादा नवीन बिझनेस सुरू करण्यासाठी काही आयडिया Laghu Udyog Small Business Ideas in 2022 with low investment in marathi कमी गुंतवणुकीत सुरू होणार बिझनेस




पैसे ही जीवनात खूप महत्वाची गोष्ट आहे. प्रत्येक व्यक्ती हा जीवनात त्याच्या अशा एका काळातून जात असतो जेव्हा त्याला पैसा कमवावा वाटतो किंवा त्याला पैसे मिळायला लागतात. आजच्या घडीला आपले शिक्षण आणि अभ्यास हा अशा स्तराचा आहे की आपल्या प्रत्येकाच्या मनात काही न काही तरी नवनवीन कल्पना सुरू असतात. आजच्या युवा पिढीच्या डोक्यात काहीतरी नवीन करण्याची जिद्द आपल्याला दिसून येते. परंतु आपले शिक्षण आणि आपल्याकडे असणारी जिद्द या दोन गोष्टी एखादा नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी पुरेशा नाहीत. तुम्ही नवीन एखादा व्यवसाय जरी सुरू केला तरी त्याला पुढे सुरू ठेवणे हे कठीण असते.




कमी खर्चातील व्यवसाय (Small Business Ideas in Marathi)


जर एखादा व्यक्ती त्याचा स्वतःचा व्यवसाय सुरू करत असेल तर त्यासाठी त्याला एक चांगली रक्कम गुंतवणूक म्हणून आणि एक प्लॅनिंग असणे गरजेचे असते. आता गुंतवणूक म्हणले की तुमच्यासमोर एक मोठी रक्कम येत असेल मात्र कमीत कमी गुंतवणुकीत देखील आपण आपला एक बिझनेस सुरू करू शकतो.




इथे आम्ही अशाच काही बिझनेस आयडिया विषयी सांगणार आहोत ज्यामध्ये तुम्ही कमीत कमी गुंतवणूक करून स्वतःचा व्यवसाय करू शकता.




1) रिक्रुटमेंट फर्म (Recruitment Firm Business Ideas in Marathi)


रिक्रुटमेंट फर्म म्हणजे अशी एक एजन्सी आहे जिच्या माध्यमातून युवा वर्गाला त्यांच्याशी निगडित क्षेत्रात जॉब मिळवून दिला जातो. तुम्ही जर अशा प्रकारच्या व्यवसायाविषयी विचार करत असाल तर तुम्हाला एका चांगल्या नेटवर्क ची गरज असते. आजच्या काळात अनेक मोठ्या कंपन्या कर्मचाऱ्यांना शोधण्यासाठी अशा फर्म ची मदत घेतात. त्यातून त्यांना सहज कर्मचारी भेटतात. कंपनी कडून अशा फर्म्स ला कर्मचाऱ्याच्या पगारातील काही टक्के पैसा मिळतो.




2) रिअल इस्टेट कंपनी (Real Estate Company Business Ideas in Marathi)


व्यक्ती जितका जास्त पैसा कमावतो तितका जास्त त्याला कुठे तरी गुंतवणूक करण्याची गरज पडते. प्रॉपर्टी मध्ये गुंतवणूक करणे हे खूप फायद्याचे ठरते. जर एखादा व्यक्ती रिअल इस्टेट कम्पनी मधून एखादी प्रॉपर्टी खरेदी करायची असेल तर त्या कंपनीला त्या व्यक्तीकडून प्रॉपर्टीच्या किंमतीच्या काही टक्के रक्कम ही मिळते. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे एक रिअल इस्टेट कंपनी सुरू करण्यासाठी गुंतवणूक ही खूपच कमी प्रमाणात लागते.




3) ऑनलाइन मार्केटिंग (Online Shopping Portals Business Ideas in Marathi)


ऑनलाइन मार्केटिंग चा अर्थ इथे आपण कोणतीही वस्तू ऑनलाइन विक्री करू शकतो हा होतो. यामध्ये महिलांच्या वापरातील वस्तू पासून ते घरघुती किराणा वैगेरे सर्व काही तुम्ही ऑनलाइन प्लॅटफॉर्म च्या माध्यमातून विक्री करू शकतात. यामध्ये तुम्हाला स्टॉक भरून ठेवायची गरज पडत नाही. जेव्हा तुमच्याकडे एखादी ऑर्डर येईल त्यानंतर तुम्ही ती वस्तू लगेच खरेदी करून तिची पुनरविक्री करू शकता. याप्रकारे तुम्हाला एकाच वेळी जास्त गुंतवणूक करण्याची काही गरज नसेल.


4) ऑनलाइन ब्लॉगिंग आणि स्वतःची वेबसाईट बनविणे (Blogging and Website Business Ideas in Marathi)


आजच्या काळात सर्वात चांगला आणि तुम्हाला वाटेल तेव्हा वाटेल तसे काम करता येईल असा हा एकमेव व्यवसाय आहे. हा बिझनेस सुरू करण्यासाठी तुम्हाला वेबसाईट साठी डोमेन नेम घेण्यासाठी लागणार सर्वात कमी खर्च येतो. जर तुम्हाला होस्टिंग साठी जर पैसे खर्च करायचा नसतील तर तुम्ही गुगल ब्लॉगर या फ्री प्लेटफॉर्मचा वापर करून वेबसाईट सुरू करू शकता. यामध्ये देखील अनेक वेबसाईट साठी डिझाईन उपलब्ध आहेत. या सर्वांचा वापर करून आपण लिहायला सुरु करू शकता. जस जसा तुमचा ब्लॉग प्रसिद्ध होत जाईल तसे तसा तुम्हाला पैसे मिळायला लागतील. वेबसाईट कशी बनवायची याविषयी अधिक माहिती जाणून घ्या.




5) इव्हेंट मॅनेजमेंट फर्म (Event Management Business Ideas in Marathi)


आजच्या घडीला सर्व लोक इतके जास्त बिझी झालेले आहेत की प्रत्येकाला स्वतःच्या घरातील एखाद्या समारंभाचे प्लॅनिंग देखील करता येत नाही. त्यांना त्यासाठी वेळच नाहीये. घरातील कोणताही समारंभ असेल तर तो चांगल्या प्रकारे प्लॅन व्हायला हवा असे प्रत्येक व्यक्तीला वाटत असते. इव्हेंट मॅनेजमेंट फर्म ही अशी संस्था असते जी असे समारंभ अगदी सुरळीत आणि प्लॅनिंग सोबत करत असते. या बदल्यात ते काही पैसे घेतात मात्र त्यांच्याकडून तुमच्या कार्यक्रमाचे अगदी व्यवस्थित आयोजन केले जाते त्यामुळे लोक आता कार्यक्रम त्यांना देत असतात. असा बिझनेस तुम्ही सुरू करून चांगल्या प्रकारे कमी गुंतवणुकीत जास्तीत जास्त पैस्व कमवू शकता.


6) ट्रेनिंग इन्स्टिट्यूट (Training Institute Business Ideas in Marathi)


ट्रेनिंग इन्स्टिट्यूट मध्ये तुम्ही कोणत्याही प्रकारची ट्रेनिंग इतरांना देऊ शकता. तुम्ही स्वतःची इन्स्टिट्यूट सुरू करून त्यात काही ट्रेनर कमिशन किंवा सॅलरी बेसीस वर घेऊन त्यांच्याद्वारे लोकांना ट्रेनिंग देऊ शकता. यासाठी तुम्हाला एक चांगली जागा असणे गरजेचे आहे. याशिवाय तुम्हाला इतर कोणतीही गरज नसेल.




7) ज्वेलरी बनविणे (Jewel Making Business Ideas in Marathi)


आजच्या काळात सोन्याच्या दागिन्यांपेक्षा आर्टीफिशियल दागिने जास्त वापरले जात आहेत. यामध्ये लोकांना दररोज नवनवीन डिझाईन हव्या आहेत. जर तुमच्याकडे अशाच प्रकारच्या काही आयडिया असलेल्या डिझाइन्स असतील तर तुम्ही त्या डिझाईनच्या नवीन ज्वेलरी बनवू शकता. कमीत कमी इन्व्हेस्टमेंट मध्ये तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकतात.




8) महिलांसाठी जिम (Female Gym Business Idea in Marathi)


आजच्या काळात आपण बघितले तर महिलांमध्ये प्रत्येक 2 महिलांच्या मागे एका महिलेचा वजन वाढलेले आहे. त्यामुळे फक्त महिलांसाठी एक स्वतंत्र जिम सुरू करणे ही आयडिया फायदेशीर ठरेल. महिलांसाठी कमी मशीन सोबत तुम्ही जिम सुरू करू शकता. यामध्ये तुम्हाला गुंतवणूक जास्त लागणार नाही. पुरुषांसाठी असणाऱ्या जिमच्या तुलनेत खूप कमी गुंतवणुकीत हा व्यवसाय सुरू होऊ शकतो.


9) मोबाईल फूड कोर्ट (Mobile Food Court Business Idea in Marathi)


आजच्या काळात कोणाकडे जास्त वेळ नाहीये. त्यामुळे अनेक लोक एखाद्या रेस्टॉरंट मध्ये जाऊन जेवण करण्याऐवजी घर बसल्या ऑर्डर करून खाणे पसंत करतात. त्यामुळे मोबाईल फूड कोर्ट ही बिझनेस म्हणून सुरू करण्यासाठी एक चांगली आयडिया आहे.




10) वेडिंग प्लॅनर (Wedding Planner Business Idea in Marathi)


वेडिंग प्लॅनर म्हणजे एखाद्याच्या लग्नाची संपूर्ण जबाबदारी स्वतःवर घेणे होय. यामध्ये तुम्हाला तुम्ही केलेल्या आयोजनाचे पैसे मिळतात. आजच्या काळात सर्व काही मॅनेज करणे कठीण आहे त्यामुळे लोक लग्नासाठी बाहेरून लोकांना ऑर्डर देतात. त्यामुळे आताच्या काळात ही एक चांगली आयडिया आहे.




11) कोचिंग इन्स्टिट्यूट (Coaching Institute Business Idea in Marathi)


ऑनलाइन चा काळ आता सुरू झालेला आहे आणि त्यामुळे तुम्ही घर बसल्या एक कोचिंग इन्स्टिट्यूट सुरू करू शकता. यामध्ये तुम्हाला सर्व काही ऑनलाइन करायचे असल्याने कोणत्याही प्रकारे जागेची किंवा इन्व्हेस्टमेंट ची गरज नसणार आहे. तुम्ही ज्या क्षेत्रात शिक्षित आहात आणि तुम्हाला जे येत असेल त्या विषयी तुम्ही ऑनलाइन शिकवू शकता.




12) मॅट्रीमोनी सर्व्हिस (Matrimony Business Idea in Marathi)


तुम्ही जर एखाद्या सोशल मीडियावर चांगले ऍक्टिव्ह असाल आणि तुम्हाला लोकांशी ओळख करून घेणे आणि लोकांशी ओळख ठेवणे आवडत असेल तर तुम्ही लग्न जुळविण्यासाठी एखादी मॅट्रीमनी सर्व्हिस सुरू करू शकता. तुम्ही यामध्ये वधू वरांचे मिलन केंद्र सुरू करतात आणि दोन लोकांचे लग्न लावून देतात. यासाठी तुम्हाला काही पैसे मिळतात. तुमची या बिझनेस मध्ये गुंतवणूक खूप कमी असते आणि कमाई लाखात होऊ शकते.




13) योगा शिक्षक (Yoga Instructor Business Idea in Marathi)


तुम्हाला जर पार्ट टाईम मध्ये एखादा व्यवसाय सुरू करायचा असेल तर ही तुमच्यासाठी एक बेस्ट आयडिया आहे. जर तुमच्याकडे याच्याशी निगडित सर्टिफिकेट नाहीये तर मग तुम्ही काही कोर्सेस करून हे सर्टिफिकेट सहज मिळवू शकतात. याद्वारे तुम्ही तुमचा बिझनेस सुरू करू शकतात.




14) इंटेरिअर डिझाईनर (Interior Designer Business Idea in Marathi)


हा देखील एक कोर्स आहे आणि याचे प्रमाणपत्र तुम्ही कधीही मिळवू शकतात. यामध्ये व्यवसायामध्ये तुम्ही एखादा ऑफिस किव्हा घराच इंटेरिअर डिझाईन करून देऊ शकता व त्या मोबदल्यात तुम्हाला पैसे भेटतात.



15) ऑनलाइन किराणा दुकान (Kirana or Grocery Store Business Idea in Marathi)


आज सर्व लोकांना प्रत्येक गोष्ट त्यांच्या घराच्या दरवाजा पर्यंत हवी असते. त्यामुळे किराणा स्टोअर सुरू करून घरपोहोच डिलिव्हरी देणे ही एक चांगली बिझनेस आयडिया आहे. यामध्ये तुम्हाला एकदाच सर्व सामान घेऊन ठेवायची गरज नसेल. जशी ऑर्डर येईल तशी तुम्ही मागणी करून पुढे लोकांना विक्री करू शकता.




16) इन्शुरन्स एजन्सी (Insurance Agency Business Idea in Marathi)


आजच्या काळात इन्शुरन्स म्हणजेच विमा ही लोकांची सर्वात मोठी गरज बनलेली आहे. अशा काळात अनेक कंपन्या स्वतःचे काम पुढे नेण्यासाठी लोकांचे इन्शुरन्स करण्यासाठी एजंट ठेवत असतात. तुम्ही अशाच प्रकारे एक एजंट बनून स्वतःची इन्शुरन्स एजन्सी सुरू करू शकता. तुम्हाला यासाठी काहीही गुंतवणूक करायची गरज नाहीये आणि याउलट इन्शुरन्स काढून दिल्यानंतर कंपन्या तुम्हाला काही कमिशन देखील देतील.




17) फेस्टिव्हल गिफ्ट बिझनेस (Festival Business Idea in Marathi)


एखादा सण उत्सव असेल तर मग एखाद्या गिफ्ट शिवाय ते अपूर्णच असतात. अशा काळात तुम्ही सण उत्सवांसाठी गिफ्ट बिजनेस सुरू करू शकतात. तुम्हाला एखादा उत्सव निवडून त्याच्याशी निगडित काहीतरी गिफ्ट शोधायचे आहेत आणि त्यांची विक्री करण्याचा व्यवसाय सुरू करायचा आहे. हे गिफ्ट एकमेकांना देण्यासाठी लोक खरेदी करतील अशी असावीत. तुम्हाला काहीतरी वेगळं गिफ्ट द्यायच्या आयडिया असतील आणि तुम्ही त्या वस्तूंची विक्री केली तर मग तुम्हाला यातून लवकरच खूप जास्त फायदा होऊ शकेल.




18) मनुष्यबळ पुरविणे (Provide Manpower Business Idea in Marathi)


मनुष्यबळ पुरविणे याचा साधा सरळ अर्थ आहे की लोकांना जॉब देणे. किंवा एखाद्या कंपनीला कामगार शोधून देणे. प्रत्येकाला सध्या जॉब हवा आहे आणि जॉब मिळविणे तसे कठीण होत चाललेले आहे. त्यामुळे तुम्ही अशा लोकांना जॉबच्या संधी मिळवून देऊन त्यातून कमिशन बनवू शकता. यासाठी तुम्हाला मोठ्या कंपन्या मध्ये जॉबच्या संधी शोधाव्या लागतील आणि ज्यांना गरज आहे त्या व्यक्तींच्या पर्यंत या संधी घेऊन जाव्या लागतील. काहीही गुंतवणूक न करता या व्यवसायातून तुम्ही लाखो रुपये कमवू शकता.




19) किराणा दुकान (Grocery Store Business Ideas in Marathi)


एक किराणा दुकान हे एका छोट्या जागेत थोड्या सामानापासून देखील सुरू होऊ शकते. तुम्ही जिथे राहता तिथे जर जवळपास दुकान कमी असतील किंवा बाजारातून सामान आणण्यासाठी तुम्हाला थोडं लांब जावे लागत असेल तर मग तुम्ही तुमच्या घरातच एक किराणा दुकान सुरू करू शकता. कमी गुंतवणूक करून सुरुवात करण्यासाठी ही एक चांगली संधी आहे.




20) आईस्क्रीम पार्लर (Ice Cream Parlour Business Ideas in Marathi)


थंडी असो किंवा उन्हाळा, लोकांना आईस्क्रीम खायला खूप आवडते. जेवणानंतर काही लोकांना आईस्क्रीम खाण्याची सवय असते आणि जर त्यांना ती मिळाली नाही तर ते आइस्क्रीम खाण्यासाठी कितीही दूर जायला तयार असतात. तुम्ही तुमच्या घरातील फ्रीज मध्ये आईस्क्रीम ठेवून घरबसल्या स्वतःचे एक आईस्क्रीम पार्लर सुरू करू शकतात. यामध्ये तुम्हाला जास्त गुंतवणूक करण्याची गरज नाहीये. हळूहळू तुम्ही तुमचा हा व्यवसाय वाढवू शकतात.




Click To Download

Post a Comment

Previous Post Next Post