How to Earn Money from Facebook

how to earn money from facebook

How to Earn Money from Facebook in Marathi: फेसबुक वरून पैसे कसे कमवतात? Facebook काय आहे हे तर जवळपास सर्व इंटरनेट वापरणाऱ्या लोकांना माहिती असेल. परंतु तुम्हाला याच फेसबुकचा वापर करून पैसे कसे कमवता येतील याविषयी माहिती आहे का? हो तुम्ही योग्यच ऐकले आहे की याच Facebook च्या माध्यमातून पैसे कमवता येतात. हे ऐकून अनेक लोकांना आश्चर्य वाटले असेल पण लक्षात घ्या हे सर्व काही खरे आहे, यामध्ये काहीही खोटेपणा नाहीये. आज आपण याच विषयावर म्हणजे फेसबुक वरून पैसे कसे कमवतात याविषयी माहिती जाणून घेणार आहोत.



कदाचित तुम्ही फेसबुकचा वापर याआधी likes आणि share करण्याच्या पलीकडे कोणत्या दुसऱ्या गोष्टीसाठी केला नसावा. कसे वाटेल जेवहा तुम्हाला फेसबुक वापरून फ्री मध्ये पैसे मिळतील तर? शोधले तर असे अनेक मार्ग आहेत ज्यांचा वापर करून तुम्ही खूप सहज पैसे कमवू शकतात. त्याविषयीच आज आपण जाणून घेणार आहोत.

एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की जेव्हा कधी आपण अशी एखादी गोष्ट करतो ज्यात तुम्हाला आनंद मिळत असेल तर ती गोष्ट करताना कोणत्याही प्रकारे काम करतोय असा तणाव जाणवणार नाही. शिवाय तुम्हाला असे काम करण्यात अधिकाधिक आनंद वाटेल आणि तुम्हाला त्यात आणखी काहीतरी नवीन करण्याची इच्छा निर्माण होईल.



त्यासोबत जर तुम्हाला हे काम करण्याचे चांगले पैसे मिळत असतील तर याशिवाय दुसरी चांगली संधी कुठेही नाहीये. Facebook चा वापर तर आपण सर्वजण सतत करत असतो त्यामुळे आम्ही आज विचार केला की आज आपण फेसबुक वरून पैसे कसे कमवता येतात याविषयावर माहिती तुमच्यापर्यन्त पोहोचवू.


फेसबुक काय आहे? (What is Facebook in Marathi)



फेसबुक (Facebook) हे नाव अनेकांनी ऐकलेले आहे. हे एक सोशल मीडिया नेटवर्क आहे ज्याच्या माध्यमातून आपण आपल्या नातेवाईकांसोबत आणि मित्रांसोबत online जोडले जाऊ शकतो. थोडक्यात सांगायचे झाल्यास हा इतर लोकांशी जोडले जाण्याचा एक सोपा मार्ग आहे. जसे आपल्याला आधीच माहिती आहे की फेसबुक बिलकुल फ्री आहे, यामध्ये आपण फ्री मध्ये अकाउंट बनवू शकतो. यामध्ये तुम्हाला हवे तितके पेजेस तुम्ही बनवू शकता आणि तुम्हाला हवा तितका वेळ याचा वापर तुम्ही करू शकतात.



एक गोष्ट मी तुम्हाला आधीच सांगतो की फेसबुक वर कोणतेही काम करण्याचे फेसबुक तुम्हाला पैसे देत नाही परंतु ही गोष्ट देखील तितकीच खरी आहे की फेसबुकचा वापर करून पैसे नक्कीच कमवता येतात. कारण फेसबुक वर करोडो लोकांचे अकाउंट बनलेले आहेत. आपल्याला या लोकांपर्यंत पोहोचायचे असेल तर फेसबुक हे सर्वात प्रभावी माध्यम आहे. चला तर मग जाणून घेऊयात की फेसबुक वापरून पैसे कसे कमवता येतात.



फेसबुक वापरून पैसे कसे कमवता येतात?

इथे मी तुम्हाला अशा काही मार्गांविषयी सांगणार आहे ज्यांचा अवलंब करून कोणीही फेसबुक वरून हव्या तितक्या प्रमाणात पैसे कमवू शकतो.



Facebook Page वापरून पैसे कसे कमवतात?



Step 1: सर्वात आधी एक Niche शोधा

तुम्हाला पहिलेच विचार करावा लागेल की तुम्हाला नक्की कोणत्या विषयावर ज्ञान आहे. त्यानुसारच मग तुम्ही त्या niche वर काम करायला हवे. तुम्हाला त्या niche मध्ये जास्तीत जास्त interest असायला हवा आणि त्यामध्ये तुम्हाला काहीतरी माहिती लिहिता यायला हवी. तुमची आवड जर त्या विषयात नसेल तर तुम्ही त्या विषयावर तुमचा 100% कधीच देऊ शकणार नाही. त्यासाठी सर्वात आधी तुम्ही तुमची niche निवडा.


Step 2: तुमच्या फेसबुक पेजवर Content Publish करा

असे बोलले जाते की Facebook page वरून खूप कमी organic traffic येते. हो ही गोष्ट खरी आहे मात्र जर तुम्ही नियमित मेहनत घेतली आणि चांगल्या प्रकारे content publish करत गेला तर तूमच्यावर त्या visitors चा विश्वास निर्माण होईल आणि त्यामुळे तुमच्याकडे हळू हळू, पण खरे आणि निरंतर टिकणारे viewers येत राहतील.



प्रत्येक दिवशी एक लेख लिहिणे प्रत्येकाला शक्य नाहीये त्यामुळे तुमच्याकडे स्टॉक मध्ये रिजर्व्ह काही आर्टिकल्स असायला हवेत. जेणेकरून तुम्ही कधीच थांबणार नाहीत. त्यासाठी तुम्ही पोस्ट शेड्युल देखील करू शकतात.



Step 3: इतरांसोबत relationship बनवा

जर तुम्हाला मार्केटिंग मध्ये जायचे असेल तर relationship build करणे तुम्हाला जमले पाहिजे. कारण जर तुमचे page खूप जास्त प्रसिद्ध आहे तर मग ही तुमच्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे. कारण इतर advertisers तुम्हाला तुमच्या page वर ऍड देण्यासाठी पैसे देतील.



याशिवाय तुमचे त्या व्यक्ती सोबत एक चांगले संबंध देखील निर्माण होतील. याचा वापर तुम्ही भविष्यात करून घेऊ शकतात. Sponsored post हे या प्रकारच्या कमाईला नाव देण्यात आलेले आहे. याशिवाय तुम्ही इतर ब्रँड च्या ads देखील तुमच्या page वर देऊ शकतात.



Step 4: Make More Money

जस जसा तुमचा fan base वाढत जाईल तसे तुम्हाला जास्त पैसे कमविण्याचे रस्ते खुले होत जातील. यामध्ये affiliate marketing सारखे मार्ग देखील तुमच्यासाठी खुले आहेत.



Products विकून पैसे कसे कमवतात?

Facebook मध्ये make an offer या पर्यायाचा फायदा तुम्ही products विक्रीसाठी करून घेऊ शकतात. असे करण्यासाठी तुम्ही कोणत्याही product ची लिंक तुमच्या लिंक बॉक्स किंवा डिस्क्रिपशन बॉक्स मध्ये देऊ शकतात. त्यासोबत एखादा coupon code देखील देऊ शकतात जेणेकरून जो तिथून खरेदी करणार आहे त्याला काही discount देखील मिळेल.



तुम्ही इतर ई-कॉमर्स साईट्स मधील affiliate च्या लिंक्स देखील वापरू शकतात. यामधून तुम्हाला चांगले कमिशन मिळेल. यामध्ये amazon, flipkart, snapdeal यासारख्या कंपन्यांचे affiliate programs आहेत.



Freelance Facebook marketer बनून पैसे कमवा

तुम्ही एक फेसबुक मार्केटर बनून देखील पैसे कमवू शकतात. परंतू एक चांगला फेसबुक मार्केटर बनण्यासाठी तुमच्यामध्ये काही विशेषता असणे गरजेचे आहे.


तुम्हाला फेसबुक मधील statistics वाचता यायला हव्यात. म्हणजे तुम्हाला हे माहिती असायला हवे की कोणत्या प्रकारच्या पोस्ट कधी पब्लिश केल्याने ती जास्त चांगला result देऊ शकते. तुम्हाला एक चांगली स्ट्रॅटेजी बनवता यायला हवी. कारण एखादे campaign तुम्हाला यशस्वी करायचे असेल तर एक चांगली स्ट्रॅटेजी प्लनिंग असणे खूप गरजेचे असते. तुमच्यात आकर्षक असे Facebook page content लिहिण्याची कला असायला हवी. कारण तुमच्या कडे अशी चांगली कला असेल आणि लोकांना ती आवडली तर मग तुमच्या पोस्ट ला जास्तीत जास्त रिस्पॉन्स हा मिळणार असतो.

तुम्हाला याची माहिती असायला हवी की कोणत्या प्रकारचे कंटेंट हे कोणत्या काळात चांगले परफॉर्म करते.



Facebook Apps मधून पैसे कमवा

जर तुम्हाला app development जमत असेल तर मग तुम्ही खूप सहज Facebook app वरून पैसे कमवू शकतात. तुम्ही फेसबुक सोबत जोडले जाऊन देखील हे काम करू शकतात. App develop केल्यानंतर त्यामध्ये तुम्ही Banner ads किंवा दुसऱ्या कंपन्यांच्या जाहिराती टाकून पैसे कमवू शकतात.


Facebook Account विक्री करून पैसे कमवा

आता सध्या ट्रेंड सुरू झालेला आहे की तुम्ही फेसबुक अकाउंट विक्री करून पैसे कमवू शकतात. हे खाते दुसरे मार्केटर्स खरेदी करत असतात. त्यांना या accounts मधून जुने असल्याने फेसबुक कडून Preference देतात. आणि जर तुमच्या फेसबुक अकाउंट ला जास्तीत जास्त फॉलोवर्स असतील तर मग तुम्हाला त्याच्या मोबदल्यात खूप मोठी रक्कम देखील मिळू शकते.



Facebook Group वरून पैसे कसे कमवतात

यासाठी तुम्हाला सर्वात आधी Facebook Group बनवायचा आहे. तुम्हाला 10 हजार पेक्ष्या जास्त फॉलोवर्स कसे येतील यासाठी प्रयत्न करायचा आहे. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हे सर्व मेंबर्स ऍक्टिव्ह असायला हवेत. त्यासाठी तुम्हाला ग्रुप वरील मेम्बर्स ला सतत engage करून ठेवावे लागते. यासाठी तुम्ही relevant questions, blog post, images आणि polls वापरू शकतात.



खाली दिलेल्या मार्गांचा अवलंब करून तुम्ही सहज पैसे कमवू शकतात.



Paid Survey

Sponsored Content Publish करून

आपले product/ book/ services विक्री करून

Affiliate Marketing



PPC नेटवर्क मधून पैसे कमवा

PPC (Pay per click) किंवा CPC (Cost Per Click) हे एक इंटरनेट advertising model आहे त्याचा वापर वेबसाईटवर ट्राफिक आणण्यासाठी केला जातो. जेव्हा कधी viewers हे ads वर क्लीक करतात तेव्हा advertising publishers ला एजन्सी पैसे देतात. Viral9, Revcontent असे अनेक नेटवर्क उपलब्ध आहेत. त्यासाठी तुम्हाला network मध्ये sign up करावे लागते. तुम्हाला त्या नेटवर्क च्या ऍड तुमच्या वेबसाईटवर लावता येतात आणि मग तुम्हाला त्यातून क्लिक अनुसार पैसे मिळतात. तुमचे फॅन्स जर टियर 1 countries मधील असतील तर तुम्हाला जास्तीत जास्त पैसे मिळतील.


PPV प्रोग्रॅम जॉईन करा

हा प्रोग्रॅम PPC सारखाच आहे मात्र यात तुम्हाला VIEWS मधून पैसे मिळतात. Vidinterest सारख्या PPV Program ला तुम्ही जॉईन करू शकतात. यामध्ये तुम्हाला त्यांच्या व्हिडीओ शेअर करायच्या आहेत. यामध्ये तुम्हाला जितकी जास्त ट्राफिक मिळेल किंवा तुमचा व्हिडीओ जितका जास्त बघितला जाईल तितका जास्त पैसा तुम्हाला मिळेल.



PPD प्रोग्रॅम जॉईन करा

हे देखील PPV सारखेच आहेत परंतु यात तुम्हाला डाउनलोड चे पैसे मिळतात. यामध्ये तुम्हाला एखाद्या PPD प्रोग्रॅम ला जॉईन करायच्या आहेत. यामध्ये तुम्हाला त्याच्या काही ऍप्स देखील डाउनलोड करायच्या आहेत. तुम्हाला जितकी जास्त ट्राफिक मिळते आहे तितकी जास्त ट्राफिक डाउनलोड देखील येतील. डाउनलोड नंबर नुसार तुम्ही पैसे जास्तीत जास्त कमवू शकतात.



याशिवाय तुमच्या कडे एखादा business असेल किंवा व्यवसाय असेल तर त्याची वेबसाईट असल्यास तुम्ही फेसबुकच्या माध्यमातून promotion करू शकतात. यासाठी तुम्हाला एक Facebook page बनवावे लागेल. त्यावर तुम्हाला निरंतर पोस्ट टाकत राहव्या लागतील जेणेकरून लोकांचा तुमच्यावर ट्रस्ट वाढेल. ते सतत तुमच्या फेसबुक पेजवर जातील आणि त्यावरून तुमच्या ब्लॉग वर नियमित भेट देत राहतील.



आम्ही आज जे काही पर्याय सांगितले ते सर्व तुम्ही पैसे कमविण्यासाठी काम करू शकतात. परंतू एक गोष्ट सर्वात आधी लक्षात घ्या की तुम्हाला पेज वरून पैसे कमविण्याआधी त्या पेजला चांगले बनवायचे आहे. तुमचा कायम हाच प्रयत्न असायला हवा की लोकांपर्यंत माहितीपूर्ण माहिती असलेल्या पोस्ट जातील. यामध्ये तुम्ही जाहिराती कमी आणि चांगल्या गोष्टी जास्त शेअर करायच्या आहेत. लोकांना मूर्ख समजण्याची चूक मात्र कधीही करू नका कारण त्यांना तुमच्यापेक्षा जास्त समज असते. जेव्हा पर्यंत तुम्ही quality content पोस्ट करत राहाल तोपर्यंत ते तुमची तारीफ करतील आणि सपोर्ट देखील करतील मात्र एकदा तुमची content ची quality खराब व्हायला लागली की मग मात्र ते तुमचे पेज सोडून दुसऱ्या एखाद्या पेजला फॉलो करायला लागतात.



आज आपण काय शिकलो? / Conclusion

आम्हाला आशा आहे की Facebook वरून पैसे कसे कमवतात(How to Earn Money from Facebook in Marathi) याविषयी तुम्हाला सर्व माहिती मिळाली असेल. आम्हाला आशा आहे की आता तुम्ही देखील Facebook चा वापर करून एक चांगली रक्कम कमवू शकता.



फेसबुक वरून पैसे कसे कमवता येतात या बद्दल तुमच्या अजूनही काही शंका असतील तर कंमेंट करून नक्की सांगा. आम्ही तुमच्या शंकांच निरसन करू.



हे देखील वाचा




Click To Download

Post a Comment

Previous Post Next Post